यावर्षी आयपीलचा लिलाव पुकारणार नाहीत रिचर्ड मॅडली

Richard-Madley
मुंबई – १८ डिसेंबरला जयपूर येथे २०१९ साली होणाऱ्या १२व्या आयपीएल हंगामासाठी लिलाव होणार आहे. पण एक मोठा यावर्षी होणाऱ्या आयपीएल लिलावात बदल दिसणार आहे. आयपीएलचा लिलाव गेली ११ वर्षे पुकारणारे रिचर्ड मॅडली हे यावर्षी लिलाव पुकारताना दिसणार नाहीत. ह्युज एजमंडस यावर्षी त्यांचा जागी लिलाव करणार आहेत.

आयपीएलच्या पहिल्या हंगामापासून रिचर्ड मॅडली लिलावकर्ते आहेत. नाकावर चष्मा घेवून पाहण्याची त्यांची शैली अनेकजणांना आवडायची. भारतात त्यांच्या या शैलीसाठी त्यांचे अनेक चाहते निर्माण झाले होते. पण ते यावर्षी आयपीएल लिलावात दिसणार नसल्याचे त्यांनी ट्वीटद्वारे जाहिर केले.


त्यांनी ट्वीट करताना लिहिले की, २०१९ च्या आयपीएलमध्ये सहभागी होत नसल्याबद्दल माफ करा. माझ्यासाठी आयपीएलच्या सुरुवातीपासून स्पर्धेचा भाग होणे सन्मानाची गोष्ट आहे. भारतातील माझ्या अनेक चाहत्यांना मी मिस करेल, धन्यवाद!


रिचर्ड मॅडली यांनी आयपीएलमध्ये सहभागी न होण्याचा निर्णय त्यांचा स्वत:चा निर्णय नव्हता याबद्दल ट्वीट करताना लिहिले, तुम्ही दिलेल्या शुभेच्छांबद्दल धन्यवाद! पण मला एक गोष्ट स्पष्ट करायची आहे की, लिलावात सहभागी न होण्याचा निर्णय माझा नव्हता. यावर्षी मला लिलावासाठी बीसीसीआयने बोलावले नाही. क्रिकेटच्या भाषेत सांगायचे झाल्यास मला वगळण्यात आले आहे.

Leave a Comment