स्पेन आणि फ्रान्सचा दर सहा महिन्यांनी असतो ‘या’ बेटावर ताबा

island
पॅरिस- ‘फँसेस’ नावाचे एक बेट स्पेन आणि फ्रान्स यांच्या सीमेरेषेच्या मधोमध असून दर सहा महिन्यांनी या बेटावरील मालकी हक्क दोन्ही देश एकदुसऱ्याकडे सोपवतात. हे बेट मागील पाच महिन्यांपासून फ्रान्सच्या ताब्यात आहे. तर एक महिन्यानंतर आता फ्रान्स हे बेट स्पेनला परत देणार आहे. जवळपास मागील ३५० वर्षांपासून ही परंपरा सुरू आहे. फ्रान्स आणि स्पेन यांच्या सिमारेषेवरील बिदासोआ या नदीवर हे बेट आहे.
island1
बिदासोआ ही नदी या दोन देशांना वेगळे करते. ‘फँसेस’ हे बेट या नदीच्या मधोमध असल्याने याला दोन्ही देशांचे राखीव भू क्षेत्र म्हणुन जाहीर करण्यात आले आहे. मोठा ऐतिहासिक वारसा फँसेस बेटाला लाभलेला आहे. फ्रान्स आणि स्पेन यांच्यातील १६५८मधील युद्ध मिटवण्याची चर्चा याच बेटावर करण्यात आली होती.
island2
दोन्ही राजघराण्यातील मुलांच्या लग्नाने या दोन देशांतील युद्ध मिटवण्यात आले होते. फ्रान्सचे किंग लुईस चौदावे याचा आणि स्पेन देशाचे किंग फिलिप चौथे यांची कन्या या दोघांचा विवाहाने दोन्ही देशांतील वाद मिटवण्यात आला होता. त्यानंतर या बेटावर दोन्ही देशांचा मालकी हक्क असल्याचे जाहीर करण्यात आले होते. तेव्हापासून हे बेट दरवर्षी १ फेब्रुवारी ते ३१ जुलैपर्यंत स्पेनच्या मालकी हक्कात तर त्यानंतर पुढील ६ महिने फ्रान्सच्या मालकी हक्कात येते.

Leave a Comment