आंध्र प्रदेशातील ३४ हजार लोकांना देणार रोजगार पतंजली समूह

ramdev-baba
हैदराबाद – आंध्र प्रदेशात नवीन फूड पार्क पतंजली समूह उभारणार असून ३४ हजार लोकांना या फूड पार्कच्या माध्यमातून नोकरी देणार असल्याची घोषणा पतंजली उद्योग समुहाचे सर्वेसर्वा योगगुरू बाबा रामदेव यांनी केली आहे. हा प्रकल्प आंध्र प्रदेशातील विजयनगर जिल्ह्यात उभारण्यात येणार आहे.

६३४ कोटी रुपये खर्च करून आंध्र प्रदेशातील विजयनगर जिल्ह्यात फूड पार्कची स्थापना करण्यात येणार आहे. रामदेव बाबांनी यासंदर्भात आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांच्याशी या विषयावर चर्चाही केली आहे. हा प्रकल्प विजयनगर जिल्ह्यातील चिन्नारावपल्ली या ठिकाणी होणार आहे. ब्लास्ट फ्रीजर, ग्रेडिंग पॅकिंग, कोल्ड स्टोरेजसह इतर अनेक सुविधा या प्रकल्पात असतील. तसेच ४५ कोटी रुपये खर्चून ज्यूस प्लँटही या पार्कमध्ये उभारण्यात येणार आहे. या फूड पार्कचा सर्वाधिक फायदा आंध्रप्रदेशातील शेतकऱ्यांना होणार आहे. तसेच विकल्या न जाणाऱ्या भाज्यांची नासाडी या प्रकल्पामुळे टाळता येणार असल्याचे पतंजली समुहाच्या प्रवक्त्याने सांगितले.

Leave a Comment