नवी दिल्ली – राजधानी दिल्लीत २२ डिसेंबरला जीएसटी परिषदेची ३१वी बैठक होणार आहे. अद्यापपर्यंत या बैठकीच्या चर्चेचा मुद्दा निश्चित करण्यात आलेला नाही. तरी या बैठकीत सुटसुटीत कर परतावा आणि इतर विषयावर चर्चा होण्याची शक्यता असल्याचे सांगण्यात येत आहे.
दिल्लीत २२ डिसेंबरला जीएसटी परिषदेची बैठक
राजधानी दिल्लीत जीएसटी अर्थात वस्तू आणि सेवा कर परिषदेची ३१ वी बैठक २२ डिसेंबरला होत आहे. सुटसुटीत कर भरणा आणि ऑनलाईल पध्दतीने कर परतावा या विषयावर बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे. परिषदेच्या उप समितीने दिलेल्या अहवालानुसार साखरेवरील आणि आपातकालीन परिस्थितीसंदर्भात लावण्यात आलेल्या करावर देखील या बैठकीत चर्चा होण्याची शक्यता आहे.
अर्थमंत्री अरुण जेटली यांच्या अध्यक्षतेखाली यापूर्वीची ३० व्या जीएसटी परिषदेची बैठक पार पडली होती. जेटली या बैठकीत व्हिडिओ कॉन्फरंन्ससिंगद्वारे सहभागी झाले होते. या बैठकीत परिषदेच्या प्रशासकीय सुधारणांबद्दल चर्चा झाली होती. तर अधिभाराचा विषयही या बैठकीत चर्चिला गेला होता.