पुढील दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा विचार भारताने करावा – क्रिकेट ऑस्ट्रेलिया

cricket-austrelia
अॅडलेड – ४ कसोटी सामन्यांची मालिका भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात सुरु असून अॅडलेड ओव्हल येथील मैदानावर मालिकेतील पहिला सामना सुरु आहे. पण प्रेक्षकांनी या सामन्याच्या पहिल्या दिवशी पाठ फिरवल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ चिंतेत पडले आहे. त्यामुळे पुढील दौऱ्यात दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा विचार भारताने करावा, अशी विनंती क्रिकेट ऑस्ट्रेलियाने केली आहे.

अॅडलेड ओव्हल मैदानावर सामन्याच्या पहिल्या दिवशी फक्त २३ हजार ८०२ प्रेक्षकांनी हजेरी लावली होती. २०१३ मध्ये अॅडलेड स्टेडियमचे नुतनीकरण करण्यात आले होते. नुतनीकरणानंतर ही सर्वात कमी प्रेक्षकसंख्या ठरली आहे. त्यामुळे बीसीसीआयकडे ऑस्ट्रेलियाच्या क्रिकेट मंडळाने ऑस्ट्रेलिया दौऱ्यावर भारत जेव्हा पुढीलवेळेस येईल तेव्हा भारताने दिवस-रात्र कसोटी सामना खेळण्याचा विचार करावा, अशी विनंती केली आहे.

२०१५ सालापासून अॅडलेडच्या मैदानावर फक्त दिवस-रात्र कसोटी सामने खेळवले जात आहेत. अॅडलेड येथे दिवसा खूप गरम वातावरण असते, त्यामुळे प्रेक्षक सामना पहायला येत नसल्यामुळे येथून पुढे अॅडलेडच्या मैदानावर फक्त दिवस-रात्र सामनेच खेळवण्याचा विचार ऑस्ट्रेलियाचे क्रिकेट मंडळ करत आहे.

Leave a Comment