विजेंदर अमेरिकेत बॉक्सिंग स्पर्धेत खेळणार

vijendar
भारताचा व्यावसायिक मुष्टीयोद्धा आणि ऑलिम्पिकपटू विजेंदरसिंग प्रथमच अमेरिकेत बॉक्सिंग रिंग मध्ये उतरणार असून पुढच्या वर्षात फेब्रुवारी अथवा मार्च मध्ये न्यूयॉर्कच्या मेडिसन स्क्वायर गार्डनमध्ये हि स्पर्धा होणार आहे. आत्तापर्यंत व्यावसायिक पातळीवर खेळलेल्या सर्व १० फाईट विजेंदरने जिंकल्या आहेत.

मिळालेल्या माहितीनुसार विजेंदरचा क्वीन्स बरोबरचा करार संपला असून आता तो प्रसिध्द बॉक्सर मेवेदर प्रमोट करत असलेल्या टॉप रँक प्रमोशन्स बरोबर करार करणार आहे. विजेंदरने ऑलिम्पिक मध्ये कांस्य पदक मिळविले होते. तो म्हणाला, अमेरिका बॉक्सिंगचे जगातील सर्वात मोठे केन्द्र असून अमेरिकेत खेळणे हे माझे फार दिवसांचे स्वप्न होते ते आता पूर्ण होत आहे. तो मिडलवेट कॅटेगरी मध्ये ३ ते चार बाऊट खेळणार आहे. या स्पर्धेचे निकाला विजेंदरच्या बाजूने लागले तर तो वर्ल्ड टायटलसाठी उतरणार आहे.

३३ वर्षीय विजेंदरने ७ स्पर्धा नॉकआउट मध्ये जिंकल्या आहेत.

Leave a Comment