राजघराणी तसेच अंबानीं परिवार येथून खरेदी करतात बांगड्या

bibaji
बड्या लोकांचे सारेच बडे असते हे आपण जाणतो. राजस्थान राज्य तेथील राजघराणी, राजा महाराजांच्या शौर्य गाथा, लढाया, तेथील अलिशान हवेल्या या साठी जगभरात प्रसिद्ध आहे. तेथील राजांचे वंशज आजही त्यांचा वारसा सांभाळत आहेत. या घराण्यातील लेकी सुनांना भारतीय परम्परेप्रमाणे बांगड्या घालायला आवडतात हेहि खरे. पण हे बडे लोक काचेच्या बांगड्यांची खरेदी कुठून करत असतील असा प्रश्न आपल्या मनात असेल तर त्याचे उत्तर आहे जोधपुर मधील बिबाजी बँगल स्टोअर्स. या दुकानातून केवळ राजस्थानी राजघरांनाचा नाही तर अंबानी सारख्या बड्या उद्योजकांना, तसेच जुही चावला, कबीर बेदी अश्या बॉलीवूड सेलेब्रिटीनाही बांगड्या पुरविल्या जातात.

bangles
या दुकानाचे मालक आहेत अब्दुल सत्तार. गेली १५० वर्षे त्यांचे कुटुंब या व्यवसायात आहे मात्र त्यांनी दुकान सुरु केले ते १९७० साली. अब्दुल सांगतात त्यांची आजी जिला बिबिजी म्हणत असत ती राजे लोकांच्या घरी जाणून तेथील महिलांना बांगड्या भरत असे. त्यामुळे आम्ही हाच व्यवसाय पुढे सुरु ठेवला. अब्दुल याचे वडील सायकलवरून फिरून बांगड्या विकत असत. अब्दुल यांनीही सायकलवरून फिरून बांगड्या विकल्या आहेत. आता मात्र त्यांचे स्वतःचे दुकान असून त्याला त्यांनी आजीचे नाव दिले आहे.

या दुकानात काच, मेटल, खडे जडविलेल्या, लाखेच्या अश्या अनेक प्रकारच्या मोहक बांगड्या मिळतात. त्यांच्या दुकानातील बांगड्या सर्व जगात पाठविल्या जातात. येथील क्रिस्टल बांगड्या खूपच प्रसिद्ध असून तेथे असंख्य डिझाईन पाहायला मिळतात.

Leave a Comment