या कुशल न्हाव्याची बातच न्यारी

barber
पाकिस्तानच्या पंजाब प्रांतातील गुंजारवाला भागात सध्या एक न्हावी खूपच चर्चेत आहे. २६ वर्षीय महमूद ओवेस असे त्याचे नाव असून त्याचे केस कापाण्यातील कौशल्य जगात क्वचित कुठे पाहायला मिळेल. महमूद एकाचवेळी २७ धारदार कात्र्या हातात धरून अतिशय वेगाने कुशल केशकर्तन करतो. त्याचा व्हिडीओ सोशल मिडीयावर व्हायरल झाला आहे. सहा महिन्यापूर्वी त्याने स्वतःचे सलून सुरु केले असून त्याच्या दुकानासमोर ग्राहकांची रांग लागलेली दिसते. तो एकावेळी केस कापण्याचे २५० रु. घेतो.

scissors
अर्थात महमूदसाठी हा प्रवास सोपा नव्हता. लहानपणात वडील गेल्यामुळे मोठ्या कुटुंबाची जबादारी त्याच्यावर आली. त्यावेळी तो फॅशनशो मध्ये हेअर ड्रेसर किती महत्वाचे ठरतात ते पाहत होता आणि हाच व्यवसाय सुरु करण्याचा त्याने निर्णय घेतला. आशियाई भागात केस कापण्याचा व्यवसाय प्रतिष्ठेचा मानला जात नाही त्यामुळे महमूदला हि घरून विरोध होता मात्र त्याने तो न जुमानता प्रथम इराणला जाऊन विशेष प्रशिक्षण घेतले आणि नंतर इटली मध्ये काम केले. गेली १० वर्षे तो हे काम करतो आहे. प्रथम तो ७ कात्र्य एकावेळी वापरत असे, नंतर १२ आणि आता २७ कात्र्या तो वापरतो. तो सांगतो, दिसते तितके हे काम सोपे नाही. एकावेळी हातात इतक्या कात्र्या धरणे मुशकील असते पण खूप कष्टाने मी ते साध्य केले आहे. खूप सराव आणि अनुभव यासाठी हवा. माझे काम मला आवडते आणि मी काहीतरी वेगळे करतो आहे याचा मला अभिमान वाटतो. घरातील सर्वांनाच आता माझा अभिमान वाटतो.