ऐकावे ते एकेक नवलच

nepoleon
क्रूर राजे. हुकुमशाह, तानाशाह यांनी जगभरात घातलेल्या थैमानाच्या अनेक कथा आपण ऐकतो. तरीही काही गोष्टी जगापासून लपून राहिलेल्या असतात. आणि त्या अगदी नवलकथा वाटाव्यात इतक्या विचित्र असतात. अश्याच या काही नवलकथा.

जर्मनीच्या हुकुमशाह हिटलर याने ज्यू लोकांचे केलेली शिरकाण आजही नुसते ऐकले तरी अंगावर शहर येतो. जगाला महायुद्धाच्या खाईत लोटणारा हा क्रूरकर्मा खूपच धाडसी असला पाहिजे असा आपला समज होणे साहजिक आहे. पण हिटलर मांजराला खूप घाबरत असे हे ऐकले कि नवल वाटते. जग जिंकणारा जग्जेत्ता नेपोलिअन हाही मांजराला घाबरत होता.

इराकचा हुकुमशाह सद्दाम हुसेन याची वर्तणूक आणि कृती कोणाही सामान्य माणसाला लाज वाटावी अशी होती मात्र हा क्रूरकर्मा लेखक होता हे फार थोड्यांना माहिती असेल. सद्दामने झाबिबा अँड द किंग नावाचे पुस्तक लिहिले असून ते २००० साली प्रकाशित झाले आहे.

charles
ब्रिटनचे राजघराणे हे नेहमी चर्चेत असलेले घराणे. या घराण्यातील प्रिन्स चार्ल्स आणि त्यांचा मुलगा प्रिन्स विलियम्स हे राजगादीचे पुढचे वारसदार. नवलाची गोष्ट अशी कि हे दोघे एकच ठिकाणी प्रवास करणार असले तरी ते दोन वेगळी विमाने वापरतात. या मागे एखादे विमान क्रॅश झालेच तर दोघांपैकी एक जिवंत असावा असा उद्देश आहे.

Untitled-1
जगात सर्वत्र दिसणारी वस्तू म्हणजे घड्याळ. पार्टी असो, बैठक असो अथवा अन्य कार्यक्रम असो. त्याला वेळेचे बंधन असते आणि ती वेळ घड्याळ दाखविते. अमेरिकेतील लास वेगास या कॅसिनो नगरीत एक कॅसिनो असा आहे जेथे घड्याळ नाही. लोकांनी मुक्तपणाने वेळेचे बंधन न पाळता मौज मस्ती करावी असे त्यांना वाटते. उत्क्रांतीचा सिद्धांत मांडणारा डार्विन याने अनेक जनावरांचा शोध लावला. असे सांगतात तो त्याने शोध लावलेली सर्व प्रकारची जनावरे खात असे. म्हणजे नवलच की!

Leave a Comment