राष्ट्रगीतादरम्यान नितीन गडकरींना आली चक्कर

nitin-gadkar
अहमदनगर- राहुरी कृषी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभात केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांना अचानक चक्कर आली. त्यांना त्यानंतर ताबडतोब रुग्णालयात हलवण्यात आले. त्यांची प्रकृती स्थिर असल्याचे सांगण्यात येत आहे.

नितीन गडकरींनी अहमदनगरच्या राहुरी कृषी विद्यापीठाच्या दिक्षांत समारंभाला हजेरी लावली होती. त्यांचे भाषण संपल्यावर जेव्हा राष्ट्रगीत सुरू झाले तेव्हा त्यांना चक्कर आली आणि ते मागच्या खूर्चीत एकदम खाली बसले. त्याच्या बाजूला उभे असलेले राज्यपाल सी. विद्यासागर राव यांनी त्यांना सावरले. त्यानंतर तात्काळ रुग्णवाहिकेला संपर्क साधल्यानंतर डॉक्टरांचे पथक विद्यापीठात दाखल झाले.

याबाबत सुत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, गडकरींना मधुमेही असल्यामुळे अचानक चक्कर आल्याचे सांगण्यात येत आहे. दरम्यान गडकरी यांची डॉक्टरांनी तपासणी केल्यानंतर त्यांना आपल्या खाजगी वाहनातून रुग्णालयाकडे रवाना झाले आहेत. दरम्यान अचानक उद्भवलेल्या या प्रसंगामुळे कॉलेज प्रशासनाची मोठी धावपळ झालेली पहायला मिळाली.

Leave a Comment