५ हजार धावा करणारा चेतेश्वर पुजारा ठरला भारताचा बारावा खेळाडू

cheteshwar-pujara
अॅडलेड – आपल्या कसोटी क्रिकेट कारकिर्दीत ५ हजार धावांचा टप्पा भारताचा भरवशाचा फलंदाज चेतेश्वर पुजाराने पूर्ण केला आहे. पुजारा हा कसोटीमध्ये अशी कामगिरी करणारा भारताचा १२ वा फलंदाज ठरला आहे. त्याने ऑस्ट्रेलियाविरुद्ध सुरु असलेल्या पहिल्या कसोटी सामन्यात १२३ धावांची झुंजार खेळी करत हा पराक्रम केला आहे.

६५ कसोटी सामन्यांमध्ये १०८ डावात ५०.२८ च्या सरासरीने पुजाराने ५०२८ धावा केल्या आहेत. यात १६ शतके, ३ द्विशतके आणि १९ अर्धशतकांचा समावेश आहे. सध्याच्या भारतीय संघात कसोटी क्रिकेटमध्ये पुजारापेक्षा जास्त धावा या फक्त विराट कोहलीच्या ( ६३३४ धावा) नावावर आहेत. तर भारताच्या तीन खेळाडूंच्या नावावर १० हजारपेक्षा जास्त धावा जमा आहेत. त्यात मास्टर ब्लास्टर सचिन तेंडुलकर, राहूल द्रविड आणि सुनील गावस्कर यांचा समावेश आहे.

Leave a Comment