ऑस्ट्रेलिया दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद १९१

team-india
अॅडलेड – भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यात पहिल्या कसोटीतील दुसऱ्या दिवसाचा खेळ सुरु संपला असून भारताने पहिल्या डावात सर्वबाद २५० धावा केल्यामुळे ऑस्ट्रेलियाचे फलंदाज उत्तम खेळ करून मोठी आघाडी घेण्याच्या दृष्टीने मैदानावर खेळत आहेत.

ऑस्ट्रेलियाच्या डावाच्या सुरुवातीलाच इशांत शर्माच्या पहिल्याच षटकात अॅरोन फिंच त्रिफळाचीत होऊन माघारी परतला. हॅरिस आणि ख्वाजा यांनीयानंतर खेळपट्टीवर तळ ठोकत संघाचा डाव सावरला. दुसऱ्या विकेटसाठी दोघांमध्येही ४५ धावांची भागीदारी झाली. रविचंद्रन आश्विनने अखेर हॅरिसला माघारी धाडत भारताला दुसरे यश मिळवून दिले. ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवशी उपहारापर्यंत २ गड्यांच्या मोबदल्यात ५७ धावांपर्यंत मजल मारली होती. त्यानंतर हॅरिस २६ धावांवर बाद झाला. अश्विनने अनुभवी शॉन मार्शला २ धावांत माघारी धाडले. लगेचच ख्वाजा २८ धावांवर तंबूत परतला. त्यामुळे चहापानापर्यंत ऑस्ट्रेलियाची अवस्था ४ बाद ११७ अशी झाली होती. त्यानंतर तिसऱ्या सत्रात पीटर हॅंड्सकोम्ब ३४ धावांवर बाद झाला. पाठोपाठ कर्णधार टीम पेनदेखील ५ धावा करून माघारी परतला.

भारतीय संघ मोठी आघाडी घेणार असे वाटत होते. पण ट्रेव्हिस हेड यावेळी भारतासाठी डोकेदुखी ठरला. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद १९१ अशी मजल मारली आहे. भारताकडून आर. अश्विनने भेदक मारा करत तीन बळी मिळवले. त्याचबरोबर इशांत शर्मा आणि जसप्रीत बुमरा यांनी प्रत्येकी दोन बळी मिळवले.

Leave a Comment