१३० वर्षांपूर्वीचा विक्रम अश्विनने मोडला

R-ashwin
अॅडलेड – आर. अश्विनने भारत आणि ऑस्ट्रेलिया यांच्यातील पहिल्या कसोटी सामन्याच्या दुसऱ्या दिवशी ऑस्ट्रेलियाच्या शॉन मार्शला क्लीन बोल्ड केले आणि १३० वर्षांपूर्वीचा विक्रम मोडीत निघाला.

आरोन फिंचला इशांत शर्माने शून्यावर बाद करत ऑस्ट्रेलियाला सुरुवातीलाच धक्का दिल्यानंतर तीन बळी मिळवत फिरकीपटू आर. अश्विनने ऑस्ट्रेलियाचे कंबरडे मोडले. पीटर हँड्सकॉम्ब त्यावेळी संघासाठी धावून आला, त्याने पाच चौकारांच्या जोरावर ३४ धावा केल्या. ऑस्ट्रेलियाचा डाव त्यानंतरही पूर्णपणे सावरलेला नव्हता. हेडने त्यावेळी चिवट फलंदाजी करत ऑस्ट्रेलियाला आव्हानात्मक धावसंख्या उभारून देण्यात मोलाचा वाटा उचलला. सहा चौकारांच्या जोरावर हेडने नाबाद ६१ धावांची खेळी साकारली. हेडच्या अर्धशतकाच्या जोरावर ऑस्ट्रेलियाने दुसऱ्या दिवसअखेर ७ बाद १९१अशी मजल मारली आहे.


मार्शला दोन धावांवर असताना आर. अश्विनने बोल्ड केले आणि १३० वर्षांपूर्वीचा एक विक्रम मोडीत निघाला. गेल्या सहा डावांमध्ये मार्शला दोन अंकी धावसंख्या उभारता आलेली नाही. यापूर्वी १८८८ साली हा विक्रम अँड्र्यू सॅमसन यांच्या नावावर होता.

Leave a Comment