नवज्योतसिंग सिद्धूची बोलती बंद होण्याची भीती

navjyot-siddhu
माजी क्रिकेटर आणि पंजाब राज्याचे मंत्री नवज्योतसिंग सिद्धू याच्या घश्याला अति ताणामुळे त्रास झाला असून स्वरयंत्रातील स्वरतंतू खराब झाल्याने त्यांचे बोलणे कायमचे बंद होईल अशी भीती डॉक्टरनी व्यक्त केली आहे. सिद्धू यांना किमान ३ ते ५ दिवस मौन पाळण्याचा सल्ला दिला गेला असल्याचेही समजते.

मिळालेल्या माहितीनुसार देशात सध्या ५ राज्यात निवडणुकीचे पडघम वाजत आहेत आणि कॉंग्रेस साठी सिद्धू यांनी १७ दिवसात ७० प्रचार सभा घेतल्या आहेत. त्यामुळे त्यांच्या स्वरतंतुना इजा झाली आहे. शरीरात उत्साह आहे, मेंदू सजग आहे आणि सतत उंच आवाजात बोलण्याची प्रेरणा देतो आहे मात्र घसा त्याला साथ देत नाही असा हा आजार असून त्याला लीरीन्ग्जाइल्स असे म्हटले जाते. सिद्धू यांना हाच आजार त्रास देत आहे. त्यात सतत हेलिकॉप्टर, विमान प्रवासाचा ताण शरीरावर येतो आहे.

या प्रकारात घशाला विश्रांती देण्याची नितांत आवश्यकता असते त्यामुळे बोलण्यावर नियंत्रण ठेवावे लागते आणि बराच वेळ बोलणे टाळावे लागते अन्यथा हे तंतू कायमचे निकामी बनतात आणि आवाज जातो असे सांगितले जाते.

Leave a Comment