अंतराळात राहिल्याचा अनुभव देणारे पॉड हॉटेल

urbanpod
देशाची आर्थिक राजधानी मुंबईत कामाच्या शोधात किंवा कामासाठी येणाऱ्यांची संख्या नित्य वाढत असते. त्यांच्यासाठी कमी खर्चात अत्याधुनिक सुविधा देणारी हॉटेल्स हि त्यामुळे मुंबा नगरीची गरज बनली आहे. असेच एका मस्त हॉटेल मुंबईच्या अंधेरीत सुरु झाले असून त्याचे नाव आहे अर्बनपॉड हॉटेल. देशातले हे या प्रकारचे पहिले हॉटेल आहे. या हॉटेलचे डिझाईन एखाद्या सायन्स फिक्शन चित्रपटतील हॉटेल प्रमाणे आहे. त्यामुळे अंतराळात न जाताही तसा अनुभव ग्राहक घेऊ शकणार आहेत.

podho
कमी जागेत, कमी खर्चात जास्तीत जास्त आधुनिक सुविधा देण्यासाठी अशी हॉटेल जगभरात बांधली जातात. सिंगापूर मधील असे हॉटेल पाहून असे हॉटेल मुंबईत बांधण्याची कल्पना हिरेन गांधी आणि शलभ मित्तल यांना सुचली. भारतीय लोक प्रवासावर खूप पैसे खर्च करतात असे लक्षात आल्यावर कमी जागेत हॉटेल बांधण्याची मागणी वाढत चालली आहे. त्यानुसार हे हॉटेल बांधले गेले आहे.

podho1
या हॉटेल मध्ये ५० ते ८० चौरस फुट जागेच्या खोल्या म्हणजे पॉड आहेत. असे १४० पॉड येथे असून त्यात सर्व सुविधा आहेत. मूड लायटिंग, वायफाय, टीव्ही, २ युएसबी पोर्ट, प्रायव्हसी साठी स्लायडिंग डोअर, सेपरेट लॉकर शिवाय कॅफे टेरिया आणि लाउंज आहेत. या पॉड साठी साधारण २ हजार रु. भाडे आकारले जाते. तरुण युवा वर्गाच्या सर्व गरजा लक्षात घेऊन हि पॉड बांधली गेल्याने या वर्गाकडून हॉटेल ला चांगला प्रतिसाद मिळतो आहे. कामानिम्मित येणाऱ्या एकट्या दुकट्या महिला मुलींसाठी हि हॉटेल अगदी सेफ आहेत असे मालकांचे म्हणणे आहे. या पॉड मध्ये स्वतंत्र टॉयलेट सुविधा मात्र नाही. दर ८ पॉड मागे एक स्वच्छतागृह दिले गेले आहे.

Leave a Comment