मर्दाची छाती असेल तर या रस्त्यावर करून पहा ड्रायविंग

sadak
ड्रायविंग करणे हा अनेकांचा छंद असतो. त्यात धाडस ओघाने येतेच. वाहन चालविण्यात अनेकांना आनंद मिळतो, अनेकांना त्यातील थरार अनुभवायला आवडतो. ड्रायविंग करणे माझ्या डाव्या हाताचा मळ आहे अशी फुशारकी अनेकजण मारतात. अश्या चालकांसाठी चीन मधील कुन्मिंग भागातील एक रस्ता मुद्दाम सुचवावासा वाटतो. चीनच्या या भागात फक्त ६.२ किमी चा हा रस्ता आहे पण त्याच्यावर ६८ अतिशय अवघड वळणे आहेत. वरून पहिले तर एखादा अजस्त्र साप पडावा तसा हा रस्ता दिसतो.

kunming
या रस्त्यावरून गाडी चालविणे खरोखरी परीक्षा पाहणारे आहे कारण येथे ड्रायविंग मधील पक्के खिलाडी सहज मात खातात. चांगल्या चांगल्या चालकांची येथे हवा टाईट होते. हा रस्ता दुर्गम डोंगरातून जातो आणि जिंशिंग आणि जिंशाव हि दोन गावे जोडतो. येथे वाहन चालविणारा कुशल वाहक हवाच कारण थोडीशी बेपर्वाई जीवावर बेतू शकते. धोका असला तरी हा रस्ता अतिशय निसर्गरम्य असून जगात त्यासाठी हा रस्ता फेमस बनला आहे.

Leave a Comment