लंडन – शेकडो निराश वैवाहिक दांपत्यांसाठी ब्रिटनमध्ये राहणारी फायनांशियल कंसल्टंट ग्विनेथ ली स्वतःला औषध मानते. १००हून अधिक विवाहित पुरुषांसोबत तिने शारीरिक संबंध प्रस्थापित केले आहेत. ती इंटरनेटवरून वैवाहिक आयुष्यात निराश असलेल्या दांपत्यांचा शोध घेऊन त्यांच्या समस्या ती दूर करते. आपण विवाहित पुरुषांसोबत अफेअर ठेऊन शेकडो संसार तुटण्यापासून वाचवले असल्याचा दावा ली करत आहे.
ही महिला विवाहित पुरुषांसोबत अफेअर करून वाचवते त्यांचे संसार
याबाबत वेस्ट लंडनमध्ये राहणारी माजी मॉडेल ली सांगते, ती ज्या महिलांच्या पतीसोबत अफेअर ठेवते त्याची पूर्वकल्पना त्यापैकी ५० टक्केहून अधिक जणींना आहे. तरीही त्या देखील आपला पती खुश असल्याचे जाणून खुश आहेत. माझ्यासारख्या महिला विवाहित पुरुष आपल्या पत्नीमध्ये शोधतात. ते माझ्यासारख्या महिलांना भेटू शकत नाही, परिणामी त्यांचा विवाह मोडतो. आपल्या प्रोफेशनवर तिला अजिबात पश्चाताप नाही. आपल्या अफेअर्समुळे प्रत्यक्षात लग्न तुट नाहीत तर संसार मोडण्यापासून वाचतात. तिच्या मते, ती दांपत्यांची मदत करते.
ली च्या मते, महिला लग्नाच्या १० ते १५ वर्षांनंतर आपल्या मुलांमध्ये आणि करिअरमध्ये व्यस्त होतात. त्यांचे पती अशात आयुष्यात एकटे पडतात. आपण याच मॅरिड पुरुषांना आधार होऊन, शेकडो महिलांचे संसार तुटण्यापासून वाचवले आहेत असे वारंवार ली म्हणते. काउंसेलिंगसाठी तिच्याकडे येणाऱ्या दांपत्य आणि ऑनलाइन संपर्कात राहणारे बहुतांशी उद्योजक किंवा वार्षिक ४४ लाख इनकम असलेले लोक आहेत.