सलमान खान ‘द कपिल शर्मा शो’च्या पहिल्या भागाचा पाहुणा !

kapil-sharma
आगामी ‘द कपिल शर्मा शो’च्या नव्या पर्वाचे शूटींग कॉमेडियन कपिल शर्माने सुरू केले असून बॉलिवूडसह दिग्गज सेलेब्रिटी त्याच्या शोमध्ये सहभागी होत असतात. बॉलिवूडचा सुपरस्टार त्याच्या पहिल्या शोमध्ये येणार असल्याचा खुलासा केला आहे.

लवकरच सोनी टीव्हीवर ‘द कपिल शर्मा शो’ सुरू होणार असून सुपरस्टार सलमान खानसह त्याचे भाऊ सोहेल खान, अरबाज खान आणि वडील सलीम खान या शोच्या पहिल्याच भागात सहभागी होणार आहेत. कपिल शर्माच्या अगोदरच्या शोमध्ये असलेले चंदन, किकू शारदा आणि सुमोना चक्रवर्ती नव्या शोमध्येही दिसणार आहेत. या शोमध्ये रोशेल रावसह कॉमेडियन भारती सिंग आणि कृष्णा अभिषेकदेखील झळकणार आहेत. दरम्यानच्या काळात कपिल शर्मा १२ डिसेंबर रोजी प्रेयसी गिन्नीसोबत बोहल्यावर चढणार आहे.