‘सिम्बा’मधील पहिलेवहिले गाणे रिलीज

simmba
सध्या दिग्दर्शक रोहित शेट्टीचा आगामी ‘सिम्बा’ या चित्रपटाविषयी जोरदार चर्चा सुरु असून अभिनेता रणवीर सिंग, सारा अली खान, अजय देवगण ही स्टारमंडळी या चित्रपटामध्ये झळकणार असून यात मराठमोळा अभिनेता सिद्धर्थ जाधवचीदेखील वर्णी लागली आहे. काही दिवसापूर्वी अॅक्शन आणि ड्रामाने परिपूर्ण असलेल्या या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. प्रेक्षकांच्या पसंतीत हा ट्रेलर उतरल्याचे पाहायला मिळाले. नुकतेच आता ही उत्सुकता वाढविणारे असेच एक गाणे रिलीज करण्यात आले आहे.

अभिनेता अर्शद वारसीचे लोकप्रिय ‘आंख मारे और लडकी आंख मारे…’या गाण्याचे हे रिमिक्स व्हर्जन असलेल्या रणवीर सिंग आणि सारा अली खान स्टारर चित्रपटातील ‘आंख मारे’ हे गाणे रिलीज करण्यात आले आहे. रिमिक्स करण्यात आलेल्या या गाण्याला मिका सिंग आणि नेहा कक्कड यांनी गायले आहे. काही नव्या तर काही जुन्या डान्स स्टेप्सचाही समावेश नव्या अंदाजात चित्रित झालेल्या या गाण्यामध्ये करण्यात आला आहे.