परेश रावल ‘उरी’मध्ये अजित डोवाल यांच्या व्यक्तीरेखेत झळकणार

paresh-rawal
प्रेक्षक सर्जिकल स्ट्राईकच्या विषयावर आधारित ‘उरी..द सर्जिकल स्ट्राईक’ चित्रपटाची आतुरतेने वाट पाहत असून देशातील अनेक जवान उरी हल्ल्यात शहीद झाले होते. प्रेक्षकांना नुकताच या घटनेवर आधारीत ‘उरी’ चित्रपटाचा ट्रेलरही पाहायला मिळाला.

एकापेक्षा एक दमदार डॉयलॉग ‘उरी’च्या ट्रेलरमध्ये ऐकायला मिळाले. या चित्रपटाची निर्मिती रॉनी स्क्रूवाला करत असून या चित्रपटातील मुख्य आकर्षण परेश रावल असल्याचे समजते. कारण राष्ट्रीय सुरक्षा सल्लागार अजित डोवाल यांच्या भूमिकेत परेश रावल चित्रपटात झकळणार आहेत.


परेश रावल यांनी अजित डोवाल यांची भूमिका साकारण्यासाठी बरीच मेहनत घेतल्याचे ट्रेलरमध्ये दिसून येत आहे. विकी कौशल आणि यामी गौतम या चित्रपटात मुख्य भूमिकेत असणार आहेत. विकी कौशल कमांडर इन चीफच्या भूमिकेत दिसणार आहे. हा चित्रपट ११ जानेवारी २०१९ मध्ये प्रदर्शित होणार आहे.