खासदार सावित्रीबाई फुले यांची भाजपला सोडचिट्ठी

savitribai-phule
नवी दिल्ली- भाजप देशात दुही निर्माण करण्यात असल्याचा गंभीर आरोप करत खासदार सावित्रीबाई फुले यांनी भाजपला सोडचिट्ठी दिली आहे. पण फुले यांनी खासदारकीच्या राजीनाम्याविषयी अद्यापपर्यंत भूमिका स्पष्ट केलेली नाही. दरम्यान, खासदार फुले यांनी निवडणुकांच्या पार्श्वभूमीवर घेतलेल्या निर्णयामुळे पक्षाला फटका बसू शकतो.

काही दिवसांपूर्वीच दलितांच्या घरी जाऊन जेवण घेणे हा ‘फेक शो’ असल्याची घणाघाती टीका खासदार फुले यांनी केली होती. तसेच त्यांनी अॅट्रॉसिटी कायद्यातील फेरबदलाविषयी सरकारने घेतलेल्या भूमिकेवर घेतलेली भूमिका चर्चेचा विषय ठरली होती. सावित्रीबाई फुले या उत्तर प्रदेशातील राजकारणी आणि दलित-सामाजिक कार्यकर्त्या आहेत. त्या भारतीय जनता पक्षातर्फे उमेदवार म्हणून बहराईच जिल्ह्यातील बलहा येथून निवडणूक लढविली आणि १६ व्या लोकसभेच्या सदस्या बनल्या.