‘कोलार गोल्ड फिल्ड्स’चा (केजीएफ) ट्रेलर रिलीज

KGF
‘कोलार गोल्ड फिल्ड्स’च्या ( केजीएफ ) ट्रेलरला गरिबीमुळे शेवटची घटका मोजणाऱ्या आईच्या संवादापासून सुरुवात होते. लहानग्या मुलाला ती सांगते की, जेव्हा तू मरशील तेव्हा जगातील सर्वात श्रीमंत व्यक्ती असायला हवास. ७०चे दशक रशिया आणि अमेरिकेच्या युध्दाच्या तणावाखाली होते. ‘केजीएफ’मध्ये तिसऱ्या महायुध्दाकडे वाटचाल सुरू असतानाची पार्श्वभूमी दाखवण्यात आली आहे.

‘केजीएफ’ ही भारतातील सर्वात मोठी सोन्याची खान असून या काळात त्यावर कब्जा मिळवण्यासाठी संघर्ष सुरू होतो आणि नायकाची दमदार एन्ट्री होते. या ट्रेलरमध्ये बंदूकांच्या गोळ्यांचा खणखनाट, नेत्रदिपक अॅक्शन आणि दमदार संवाद पाहायला मिळतात.

हजारो लोक अपयशी ठरले पण एकाने राज्य केले. रॉकीचा मुंबईच्या रस्त्यावरुन गोल्ड माईन्स पर्यंतचा थरारक प्रवास पाहताना अंगावर रोमांच उठतात. रितेश सिधवानी, फरहान अख्तर आणि एए फ्लिल्मसची निर्मिती असलेल्या या चित्रपटाचे दिग्दर्शन प्रशांत नील यांनी केले आहे. यश आणि श्रीनिधी शेट्टी यांच्या प्रमुख भूमिका या चित्रपटात आहेत.

प्रेक्षकांना डोळ्यात न मावणारी अतिभव्य दृष्ये, कोळशाच्या खाणीवर कब्जा मिळवण्यासाठीचा रक्तरंजीत संघर्ष असलेला ‘केजीएफ’ अर्थात ‘कोलार गोल्ड फिल्ड्स’ चित्रपटाचा ट्रेलर निश्चितपणे आवडणारा आहे. सिनेवर्तुळात खूप दिवसापासून ‘केजीएफ’ बद्दलची उत्सुकता आहे. या ट्रेलरमुळे चित्रपटाची उत्कंठा वाढली आहे.