रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत दाखल झाला फळांचा राजा

mango
रत्नागिरी – जगात ज्याचा फळांचा राजा म्हणून नावलौकिक आहे, असा हापूस आंबा रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत दाखल झाला आहे. या हापूसचा दर जवळपास २५०० रुपये प्रति डझन असा आहे. दर आवाक्यात नसला तरी या आंब्याला ग्राहंकांकडून चांगली मागणी आहे.

रत्नागिरीचा हा हापूस आंबा गेल्या काही दिवसांपासून नवी मुंबईच्या वाशी मार्केटमध्ये विक्रीसाठी दाखल झालेला दिसून येत होता. पण अद्यापपर्यंत रत्नागिरीच्याच स्थानिक बाजारपेठेत हापूस उपलब्ध झालेला नव्हता. येथील आंबा खवय्यांची प्रतीक्षा आता संपली असून हापूस आंबा रत्नागिरीच्या स्थानिक बाजारपेठेत देखील विक्रीसाठी दाखल झाला आहे.

भारताच्या वाणिज्य आणि उद्योग मंत्रालयाकडून कोकणातील रत्नागिरी, सिंधुदुर्ग, पालघर, ठाणे आणि रायगड या जिल्ह्यांना हापूस उत्पादनासाठी भौगोलिक मांनाकन (जीआय) देखील मिळालेले आहे. मुंबईसह युरोप, जपान, कोरिया आणि आखातातील देशात मोठ्या प्रमाणावर मागणी असलेल्या या हापूसची चव चाखण्यासाठी खुद्द रत्नागिरीतील आंबा प्रेमी मागील अनेक दिवसांपासून वाट पाहत होते.

Leave a Comment