१८० किमी प्रती तास वेगाने धावली भारतीय बनावटीची नवी ट्रेन

indian-railway
नवी दिल्ली – सध्या राजस्थानमध्ये संपूर्ण स्वदेशी बनावटीच्या नवीन ट्रेनच्या डब्ब्यांची चाचणी सुरु असून या चाचणीचा एक व्हिडीओ रेल्वेमंत्री पियुष गोयल यांनीच ट्विटवरून शेअर केला आहे. ही पूर्णपणे भारतीय बनावटीची रेल्वे १८० किलोमीटर प्रती तास वेगाने धावत असल्याचे या ट्विटमध्ये गोयल यांनी नमूद केले आहे.


नवीन तंत्रज्ञानाच्या सहाय्याने भारतीय रेल्वे प्रवास अधिक सुखकर आणि जलद करण्याचा प्रयत्न करताना दिसत आहे. त्याचा एक भाग म्हणून भारतीय रेल्वेचा वेग वाढवण्यासाठी रेल्वेमध्ये नवीन रचनेच्या रेल्वे डब्ब्यांचा समावेश करण्यात येणार आहे. काही दिवसांपूर्वीच सोशल मिडियावर याच रेल्वे डब्ब्यांची पहिली झलक व्हायरल झाली होती. पियुष गोयल यांनी आज या गाडीच्या चाचणीचा व्हिडीओ ट्विट केला आहे. ते या ट्विटमध्ये म्हणतात, या ट्रेनची निर्मिती ‘मेक इन इंडिया’ मोहिमेअंतर्गत करण्यात आली आहे. या ट्रेनच्या वेगाची चाचणी राजस्थानमध्ये घेण्यात आली. ही ट्रेन त्यावेळी १८० किमी/तास वेगाने धावताना दिसत आहे