गुगलने आणला केवळ ५०० रुपयांचा ४जी फिचरफोन

google
मुंबई : भारतात ४जी सेवेचा विस्तार पाहता जगभरात नावाजलेली कंपनी गुगलने केवळ ५०० रुपयांत फिचर फोन लाँच करत सर्वांनाच धक्का दिला आहे. या फोनचे नाव WizPhone WP006 असे असून जिओफोनला हा फिचर फोन कडवी टक्कर देणार आहे. गुगलने या फोनमध्ये गुगल असिस्टंटही दिले आहे.

या फोनमध्ये २.४ इंचाचा डिस्प्ले देण्यात आलेला आहे. याशिवाय या फोनमध्ये ४ जीबी इंटरनल स्टोरेज आणि ५१२ एमबीची रॅम देण्यात आली आहे. जिओफोनसारखाच हा फोन KaiOS वर चालतो. १८०० एमएएच बॅटरी या फोनमध्ये देण्यात आली आहे. पाठीमागे २ मेगापिक्सलचा कॅमेरा तर पुढे VGA कॅमेरा देण्यात आला आहे. हा फोन सध्या इंडोनेशियामध्ये उपलब्ध असून त्याची किंमत IDR 99,000 (४९० रुपये) एवढी आहे. भारतातही लवकरच हा फोन लाँच केला जाण्याची शक्यता आहे.

सिंगल सिमला WizPhone WP006 हा फोन सपोर्ट करतो. यामध्ये SPRD 9820A/QC8905 हा ड्युअल कोअर प्रोसेसर देण्य़ात आला आहे. ग्राफिक्ससाठी माली-४०० जीपीयू देण्यात आला आहे. त्याचबरोबर याची मेमरी १२८ जीबी पर्यंत वाढविली जाऊ शकते.

Leave a Comment