‘या’ बादशाहाला एका दिवसात लागायचे ३५ किलो अन्न; आणि जेवणानंतर स्वीट ४ किलो

mehmood-begda
जर एखाद्या खाद्यपदार्थांकडे आपणही आकर्षित होत असाल तर तुम्ही नक्कीच फूडी आहात. पण चांगले-चांगले फूडी देखील या बादशाहासमोर टिकाव धरू शकले नसते. खाण्यासाठी माणूस कमवतो पण ही गोष्ट एखाद्याने गांभीर्याने घेतली तर त्याचिया खाण्याविषयीची ओढ तेव्हापासून प्रचंड वाढते.

गुजरातचा सहावा सुल्तान बादशाह महमूद बेगडा हा खाण्याचा खूपच शौकिन होता. त्याच्या पराक्रमासाठी जेवढा हा बादशाह प्रसिद्ध होता, तो त्यापेक्षाही जास्त त्याच्या खाण्याच्या सवयीमुळे जास्त प्रसिद्ध होता. याने गुजरातमध्ये इ.स.१४५९-१५११ या दरम्यान वयाच्या तेराव्या वर्षापासून ते ५३व्या वर्षापर्यंत शासन केले. तो त्याकाळातील जास्त काळ शासन केलेला राजा होता. सुल्तान महमूद बेगडा यांचे शरीर धष्टपुष्ट होते. तसेच त्यांचे व्यक्तिमत्व आकर्षक आणि त्यांची दाढी कमरेपर्यंत पोहचत होती. त्यांच्या मिशा देखील खूप लांब होत्या. जास्त प्रमाणात अन्नाची गरज त्यांच्या धष्टपुष्ट शरीराला होती. अनेक किस्से त्यांच्या खाण्याबाबत प्रसिद्ध आहे. असे म्हणले जाते की, तो जास्त प्रमाणात जेवत होते.

सुल्तानचा नाश्ता साधारण माणसाचे जेवढे जेवण असते त्याहूनही जास्त होता. नाश्त्यात एक कटोरी मध, एक कटोरी लोणी आणि शे-दि़डशे केळे सुल्तान खात होता. फारशी आणि युरोपीयन इतिहासकारांचा असा विश्वास होता की, सुल्तान महमूद बेगडा भरपूर जेवत होते. सुल्तान एका गुजराती टीले इतके म्हणजेच जवळपास ३५ ते ३७ किलो अन्न फस्त करत असल्याचा उल्लेख या इतिहासकारांनी त्यांच्या गोष्टींमध्ये केला आहे. जेवण झाल्यानंतर सुल्तानला गोड खायची सवय होती. त्यांना जेवणानंतर एक किंवा दोन कटोरी गोड पदार्थ खाणे पसंत होते. ते गोड खाण्याच्या बाबतही सर्वांच्या पुढे होते. कारण डिर्सटमध्ये ४.६ किलो गोड भात खात होते.

इतके सगळे दिवसभरात खाल्यानंतर कोणाला भूक लागणार नाही पण हे सुल्तान महमूद बेगड़ा यांच्याबाबतीत घडत होते. कारण रात्री अचानक लागलेल्या भूकेमुळे सुल्तान परेशान होऊ नये यासाठी त्यांच्या उशाच्या दोन्ही बाजूंना मांसाचे समोसे ठेवण्यात येत होते. यामुळे सुल्तान रात्री लागणाऱ्या भूकेला शांत करत होते. युरोपीयन इतिहासकार बारबोसा आणि वर्थेमानुसार एकदा जेवणातून सुल्तानवर विषप्रयोग करण्याचा प्रयत्न करण्यात आला होता. सुल्तानला तेव्हापासून रोज थोड्याफार प्रमाणात विष दिले जात होते. त्यांची पाचन शक्ती जेणेकरून विष पचवण्यास सक्षम होईल. असे म्हणले जाते की, त्यांनी वापरलेल्या कपड्यांनी कोणीही स्पर्श करत नव्हते. कारण त्यांचे कपडे विषारी होत असल्यामुळे त्यांना जाळत होते. बादशाह महमूद बेगड़ा यांच्या खाण्याच्या शौकावर अनेक कथा लिहीण्यात आल्या आहेत. सोबतच त्यांच्या जेवणात विष मिळवल्याच्या गोष्टीला प्रामुख्याने दर्शविण्यात आले आहे. इतिहासकारांनी या खाण्याच्या शौकिन असणाऱ्या सुल्तानला खूपच प्रचलित केले होते.