‘कॅप्टन मार्वल’चा ट्रेलर रिलीज

captain-marvel
लवकरच भारतात ‘मार्वल कॉमिक्स’मधील कॅरल डेन्वर्सच्या व्यक्तीरेखेवर आधारित ‘कॅप्टन मार्वल’ हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. इंग्रजीसह हिंदी,तामिळ,तेलुगु आणि मल्याळम या भाषांमध्ये हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे. तत्पूर्वी नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर रिलीज करण्यात आला आहे. भव्य आणि साहसी दृष्यांचा समावेश या ट्रेलरमध्ये करण्यात आल्यामुळे प्रेक्षकांच्या पसंतीत तो उतरत आहे.

या चित्रपटाच्या निर्मिताला मार्वल स्टुडिओने २०१३ पासून सुरुवात केली असून पुढील वर्षी ८ मार्च २०१९मध्ये तो प्रदर्शित होणार आहे. अॅक्शन्स आणि कल्पनेची भरारी असलेल्या या चित्रपटामध्ये डेन्वर्सच्या भूमिकेसाठी लार्सनची निवड करण्यात आली आहे. बोडन आणि फ्लेक दिग्दर्शित या चित्रपटासाठी संपूर्ण टीमने चित्रपटासाठी प्रचंड मेहनत घेतली आहे.