भाई – व्यक्ती की वल्लीचा दुसरा टीझर रिलीज

bhai
आपण आपल्या व्यथा ज्यांच्या कथा वाचून वाचक विसरून जातात, अशा लाडक्या पु.लंच्या जीवनावर आधारीत ‘भाई’ या चित्रपटाचा दुसरा टीझर नुकताच प्रदर्शित झाला आहे. अभिनेता सागर देशमुख व्यतिरिक्त या चित्रपटात अभिनेता सक्षम कुलकर्णीही पु.लंची भूमिका साकारणार आहे. तर पु.लंची महाविद्यालयीन काळातील भूमिका सक्षम साकारणार आहे. सक्षमने दे धक्का, काकस्पर्श यासांरख्या अनेक चित्रपट आणि मालिकांमधून आपल्या अभिनयाची झलक दाखवली आहे. पण सक्षम पु.लं.ची भूमिका कशी साकारतो हे पाहण्यासारखे ठरणार आहे.

तर अभिनेता सागर देशमुख यांच्या खांद्यावर पंचवीशी नंतरचे पु.लं साकारण्याची जबाबदारी आहे. ‘भाई.. व्यक्ती की वल्ली’ या चित्रपटाची निर्मिती महेश मांजरेकर यांच्या ‘फाळकेज् फॅक्टरी’ या निर्मिती संस्थेअंतर्गंत करण्यात येत आहे. या चित्रपटातून पु.ल. देशपांडे यांचा जीवनपट उलगडणार आहे. हा चित्रपट पुढील वर्षी ४ जानेवारी २०१९ला प्रेक्षकांच्या भेटीला येणार आहे.