रोहित शेट्टीने प्रश्नाचे उत्तर देण्याऐवजी केला पत्रकाराचा अपमान

rohit-shetty
रोहित शेट्टी हा पैसा वसूल चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणणारा दिग्दर्शक म्हणून ओळखला जातो. रोहितचे ‘गोलमाल’ सीरिज, ‘सिंघम’ हे चित्रपट बॉक्स ऑफीसवर तुफान गाजले. त्यानंतर आता तो ‘सिम्बा’ हा चित्रपट प्रेक्षकांच्या भेटीला आणत आहे. नुकताच या चित्रपटाचा ट्रेलर प्रदर्शित झाला. ट्रेलर लाँचचा कार्यक्रम चांगलाच चर्चेत आला आहे. रोहितने या कार्यक्रमात एका पत्रकाराला चक्क त्याचा पगारच विचारला.

ट्रेलर लाँच कार्यक्रमात ‘सिम्बा’ चित्रपटाची संपूर्ण टीम उपस्थित होती. एका पत्रकाराने यावेळी रोहितला विचारले, सोशल मीडियावर शेअर केलेल्या एका व्हिडिओत तू रणवीरवर खूप पैसे खर्च केले, असे म्हणालास. तर नेमके किती खर्च केले?’ अप्रत्यक्षरित्या चित्रपटाचा बजेट किती आहे असा प्रश्न त्यातून पत्रकाराने विचारला. रोहितने यावर थेट त्या पत्रकाराला तुझा पगार किती आहे? असा प्रतिप्रश्न केला. रोहितच्या या प्रश्नावर मंचावर उपस्थित असलेला करण जोहर, सारा अली खान अवाक् झाले. सर कॅमेरा सुरू असल्याचे रोहितला पत्रकाराने म्हटले. त्यावर तो म्हणाला, हो, कॅमेरा सुरू आहेतच. जर तू तुझा पगार सांगू शकत नाही मग मी माझा बजेट का सांगू?

करण पत्रकार आणि रोहित शेट्टीच्या या प्रश्नोत्तरादरम्यान काहीतरी पुटपुटला. तुम्हाला काही बोलायचे आहे का? असा प्रश्न त्या पत्रकाराने करणला विचारले तेव्हा त्यानेही नकारार्थी मान डोलावली. रोहित चित्रपटाचा बजेट विचारताच एवढा का संतापला याचे कोडे कोणालाच उलगडता आले नाही.