२०१९ मध्ये बंद होणार मारुती अल्टोचे उत्पादन

maruti
मुंबई : २०१९मध्ये कमी किंमतीच्या मारुती अल्टो ८००चे प्रॉडक्शन बंद होणार आहे. २०१९ च्या सहाव्या महिन्यापर्यंत मारुती अल्टो ८००चे उत्पादन पूर्णपणे बंद होणार आहे. काही दिवसापूर्वी अशी बातमी आली होती की, मारुती ओमनीचे प्रॉडक्शन २०२० पासून बंद करण्यात येणार आहे.

नवीन क्रॅश चाचणी नियम भारत सरकार जुलै २०१९ पासून लागू करणार आहे. पुढील गाड्यांची निर्मिती या नियमाला अनुसरून करण्यात यावी, म्हणून मारुती ८०० चा संपूर्ण जुना स्टॉक संपवण्याच्या बेतात कंपनी आहे. २०२० पर्यंत मारुती सुझुकी BS-VI नियमात बसणाऱ्या इंजिनाची गाडी लॅान्च करण्याचा विचार करत असल्यामुळेच कंपनी ओमनी आणि मारुती ऑल्टो ८००ची निर्मिती बंद करणार आहे.

याबाबत ‘कार अॅण्ड बाईक’च्या वृत्ताअनुसार मारुती सुझुकीच्या सिनिअर व्हॉईस प्रेसिडेंट- इंजीनिअरिंग, रिसर्च, डिझाइन अॅन्ड डेव्हलपमेंट दीपक सावकर म्हणाले, भविष्यातील मानांकनाशी अनुरूप जे मॅाडेल नाही, अशा गाड्यांचे प्रॉडक्शन बंद केले जाणार आहे. सुरक्षित मानकांमुळे तसेच एमिशन नियमांमुळे बंद करण्यात येणार आहे.

Leave a Comment