नागपूरचे सर्वात जुने महाराजबाग प्राणीसंग्रहालय बंद होणार !

zoo
नागपूर : केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने औरंगाबादच्या सिद्धार्थ उद्यानातील प्राणी संग्रहालयाची परवानगी रद्द केल्यानंतर आता नागपूरच्या महाराजबाग प्राणीसंग्रहालयाची मान्यता देखील रद्द केल्यामुळे देशातील सर्वात जुने प्राणीसंग्रहालय म्हणून नुकतेच १२५ वर्ष पूर्ण करणाऱ्या ह्या प्राणीसंग्रहालयाचे भवितव्य काय? हा मोठा प्रश्न उभा झाला आहे.

इतर प्राणी संग्रहालयांपेक्षा नागपूरच्या अगदी मध्यभागी स्थित महाराजबाग प्राणीसंग्रहालय हे वेगळे आहे. कारण डॉक्टर पंजाबराव कृषी विद्यापीठाकडे या संग्रहालयाची मालकी आहे. ह्या प्राणीसंग्रहालयाची मान्यता नियम न पाळल्यामुळे आणि व्यवस्थापनातील अनेक त्रुटीमुळे केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाने रद्द केली आहे.

एकीकडे ही सत्य परिस्थिती असली तरीही दुसरीकडे हे देखील महत्वाचे आहे की, महाराजबाग प्राणीसंग्रहालयाने २०११पासून जो विकास आराखडा केंद्रीय प्राणी संग्रहालय प्राधिकरणाकडे पाठवला तो मान्य झाला नाही. त्यानंतर लीट प्लॅन मागवला, मात्र त्याचेही पुढे काही न झाल्यामुळे विकास आराखडा एवढा रखडवून मग विकास झाला नाही म्हणून मान्यता रद्द करणे हे कोंडीत पकडल्यासारखे आहे ? असा सवाल केला जात आहे.

Leave a Comment