महापालिका निवडणुकीत अनिल गोटेंचा शिवसेनेला पाठिंबा

anil-gote
धुळे – भाजपचे आमदार अनिल गोटे यांनी महापालिका निवडणुकीच्या तोंडावर ज्या प्रभागात त्यांच्या लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार नाहीत, त्यांनी अशा प्रभागातील शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा जाहीर केला आहे. शिवसेनेने गोटेंच्या या निर्णयाचे स्वागत केले आहे. पण आमदार अनिल गोटे हे येत्या विधानसभा निवडणुकीत शिवसेनेचे उमेदवार असतील, अशी चर्चा राजकीय वर्तुळात आहे.

धुळे महापालिका निवडणुकीची रणधुमाळी सुरू झाली असून आपल्या पक्षाची सत्ता या निवडणुकीत महापालिकेवर यावी यासाठी सगळे पक्ष जोमाने कामाला लागले आहेत. पण भाजपचे आमदार तथा लोकसंग्राम पक्षाचे संस्थापक अनिल गोटे यांनी या निवडणुकीच्या तोंडावर मतदानाला अवघे काही दिवस शिल्लक राहिले असताना शिवसेनेच्या ५ उमेदवारांना लोकसंग्राम पक्षाकडून पाठिंबा जाहीर केला आहे. लोकसंग्राम पक्षाचे उमेदवार ज्या प्रभागात नाहीत त्याठिकाणी शिवसेनेच्या उमेदवारांना पाठिंबा देण्यात आला आहे.

Leave a Comment