माँक फ्रुट, साखरेपेक्षा ३०० पट गोड तरीही शुगरफ्री फळ

monk
आरोग्य टिकविण्यासाठी किंवा आजारातून उठल्यावर पुन्हा शक्ती भरून यावी यासाठी ताजी फळे खावीत असे नेहमी सांगितले जाते. मात्र मधुमेह असलेल्या लोकांना गोड फळे खाण्यावर अनेक बंधने येतात. त्यांची हि समस्या माँक फ्रुट या नावाचे फळ दूर करू शकणार आहे. हे फळ साखरेपेक्षा ३०० पट गोड आहे पण या फळात साखर नाही. म्हणजे ते शुगर फ्री आहे. या फळाचे उत्पादन सध्या चीन मध्ये मोठ्या प्रमाणावर होत असले तरी भारतही या फळाचे उत्पादन सुरु झाले आहे.

हिमाचलमधील पालमपूर येथे सीएसआयआर आणि आयएचबीटी यांनी संयुक्तरित्या या फळाची मोठ्या प्रमाणावर लागवड केली आहे. या फळातील मोग्रोसाईड नावाचे द्रव साखरेपेक्षा गोड आहे. शिवाय यात अमायनोअॅसिड, फ्राक्टोज, खनिजे, जीवनसत्वे याचे प्रमाण चांगले आहे. याचा वापर पेयपदार्थ, भाजून करावयाचे पदार्थ यात सहज करता येतो. विशेष म्हणजे शेतकरी वर्गाला या फळाची लागवड करून उत्पन्न वाढविण्याचा आणखी एक स्रोत सहज मिअणार असून त्यामुळे त्यांचे उत्पन हेक्टरी दीड लाखांपर्यंत वाढू शकणार आहे.

Leave a Comment