गौतम गंभीरचा क्रिकेटला बाय बाय

gautam
टीम इंडियाला वर्ल्ड कप मध्ये २ वेळा अजिंक्यपद मिळवून देण्यात मोठे योगदान दिलेला सलामीचा तडाखेबंद फलंदाज गौतम गंभीर याने मंगळवारी क्रिकेटच्या सर्व प्रकारातून निवृत्ती घेत असल्याची घोषणा व्हिडीओ संदेशातून केली असून क्रिकेटला बाय बाय केले आहे. सध्या तो फिरोजशाह मैदानावर सुरु असलेल्या क्रिकेट स्पर्धेत खेळत असून ६ ते ९ डिसेंबर या काळात होत असलेली दिल्ली विरुद्ध आंध्र प्रदेशातील सामना त्याचा शेवटचा सामना असेल. विशेष म्हणजे याच मैदानावर गौतमने १९९९ मध्ये प्रथमश्रेणी सामना खेळून करियरची सुरवात केली होती. गेली २० वर्षे तो क्रिकेट खेळतो आहे.

३७ वर्षीय गौतम आक्रमक खेळाडू म्हणून ओळखला जातो. २०११ आणि २००७ च्या वर्ल्ड कप मध्ये त्याने भारताला विजय मिळवून देण्यात मोलाचे योगदान दिले आहे. त्याच्या नावावर ५८ टेस्ट, १४७ आंतरराष्ट्रीय वन डे असून त्याने शेवटचा कसोटी सामना इंग्लंड विरुद्ध नोव्हेंबर २०१६ मध्ये खेळला होता. त्याच्या नावावर कसोटीत ४१५४ तर वन डे मध्ये ५२३८ धावा आहेत. त्याने ३७ टी २० सामने खेळले आहेत. त्याने आयपीएल मध्ये कोलकाता नाईटरायडर्सचे नेतृत्व करताना दोन वेळा चषक जिंकला आहे.

Leave a Comment