महिंद्रा आणणार बुगातीला टक्कर देणारी हायपर इलेक्ट्रिक कार

pinin
दमदार कार्ससाठी ओळखली जाणारी भारतीय कंपनी महिंद्रा अँड महिंद्रा जगातील सर्वात वेगवान आणि पॉवरफुल हायपरकार २०१९ मध्ये लाँच करण्याच्या तयारीत आहे. हायपरकार पिनीनफेरीनो पीएफओ मध्ये महिंद्राने गुंतवणूक केली असून हि कार हायपर कार बुगाटी चिरॉनशी तगडी स्पर्धा करेल असा विश्वास व्यक्त केला जात आहे.

पिनीनफेरीनोच्या प्रत्येक चाकाला इलेक्ट्रिक मोटर पॉवर दिली गेली आहे. हि इलेक्ट्रिक हायपर कार २ सेकंदात ० ते १०० किमी तर १२ सेकंदात ३०० किमीचा वेग घेते. तिचा टॉप स्पीड आहे ताशी ३५० ते ४०० किमी. या कारचे टीझर सतत प्रसिद्ध केले जात असल्याचे तिच्याविषयी उत्सुकता वाढली आहे.

या कार मध्ये टेसला मोडेल एस पी १०० डी पेक्षा २५ टक्के मोठी बॅटरी वापरली गेली असून ती ८० टक्के चार्ज होण्यासाठी २५ ते ४० मिनिटे लागतात आणि एकदा चार्ज झाल्यावर ती ४८२ किमी अंतर कापू शकते. कारचे वजन कमी करण्यासाठी कार्बन फायबरचा वापर बॉडी आणि चासी मध्ये करण्यात आला आहे. या कराची फक्त १५० युनिट बनविली जाणार आहेत.

Leave a Comment