अॅपल २०२० मध्ये आणणार ५ जी स्मार्टफोन

app5ji
सध्या जगाच्या बाजारातील सर्व स्मार्टफोन कंपन्या त्यांचे ५ जी स्मार्टफोन पुढील वर्षात म्हणजे २०१९ सालात बाजारात आणायची जोरदार तयारी करत असताना अॅपलने मात्र त्यांचा पहिला ५ जी स्मार्टफोन २०२० मध्ये आणला जाईल अशी घोषणा केली आहे. २०१९ सालात कंपनी त्यांच्या ३ जी आणि ४ जी वर लक्ष केंद्रित करणार आहे. मिळालेल्या माहितीनुसार अॅपल ५ जी साठी इंटेल ८१६१ मोडेम चीपचा वापर करू शकेल. तसे या चिपसाठी अॅपलने मिडियाटेक कंपनीशी बोलणी सुरु ठेवली असल्याचेही समजते.

२०१८ मधल्या सर्व स्मार्टफोन मध्ये इंटेल चीपचा वापर केला गेला आहे. एकीकडे सॅमसंगने व्हेरोझोनच्या मदतीने पहिला ५ जी स्मार्टफोन २०१९ मध्ये आणण्याची तयारी सुरु केली आहे तर वनप्लसनेही त्यांचा ६ टीप्लस ५ जी सह पुढच्या वर्षात नव्याने सादर करण्याची तयारी सुरु केली आहे. हुवाई २०१९ मध्येच त्यांचा पहिला ५ जी फोन आणणार आहे.

भारतात रिलायंस जिओने लवकरच ५ जी सीम लाँच करण्याची घोषणा केली आहे आणि या सीमचे टेस्टिंग सुरु झाले आहे. मिळालेल्या माहितीनुसार या सिमची सुरवातीची किंमत २० रुपये असेल आणि त्यात अनलिमिटेड कॉलिंग, ५ जी हायस्पीड सह सर्व सुविधा ३ महिन्यांसाठी मोफत दिल्या जाणार आहेत. पुढच्या वर्षात हे सिम बाजारात येईल असे समजते.

Leave a Comment