अखेर मायक्रोसॉफ्ट ऑफिसमधील आयकॉनना मिळणार नवे रूप

microsoft
सॉफ्टवेअर क्षेत्रातील दिग्गज कंपनी मायक्रोसॉफ्टने आता आपल्या मायक्रोसॉफ्ट ऑफिस उत्पादनांतील आयकॉनना नवे रूप देण्याचे ठरविले आहे. मायक्रोसॉफ्ट ऑफिसच्या यापूर्वीचे अपडेट पाच वर्षांपूर्वी झाले होते आणि त्यानंतर पहिल्यांदाच या आयकॉनना नवे रूप देण्यात येत आहे.

नव्या चिन्हांमध्ये ऑफिस365 या उत्पादनाच्या अधिक निर्बाध आणि सहयोगी स्वरूपाचे प्रतिबिंब पडले आहे, असे एएनआय वृत्तसंस्थेने म्हटले आहे.
नव्या स्वरूपानुसार, एक्सेलचे आयकॉन आयताकृती आकारात केले असून त्यात स्प्रेडशीट्स प्रतिबिंबित करण्यासाठी त्यांचे डिझाईन करण्यात आले आहे, तर पॉवरपॉईंटचे आयकॉन एक गोलाकार पाय चार्ट आहे. आऊटलुकचे चिन्ह म्हणून लिफाफा करण्यात आला आहे.

येत्या काही महिन्यांमध्ये नवीन चिन्हे अॅप्स आणि वेबवर पोचतील. मात्र चिन्हांमधील या बदलासोबत संबंधित उत्पादनांच्या कामात कुठलाही बदल करण्यात आलेला नाही.

मायक्रोसॉफ्ट ऑफिस डिझाइनचे प्रमुख जॉन फ्रायडमन यांनी या आठवड्यात मीडियम या ब्लॉगिंग संकेतस्थळावर नवीन आयकॉनचे अनावरण केले होते. तसेच त्यांनी या रिडिझाईनच्या मागील विचार-प्रक्रिया देखील स्पष्ट केली होती. हे आयकॉन आले तेव्हाच्या तुलनेत आजचे जग खूप बदलले आहे, असे त्यांनी म्हटले आहे.

Leave a Comment