विनेश फोगाट, सोमवीर राठी १३ डिसेम्बरला चतुर्भुज होणार

vinesh
राष्ट्रकुल आणि आशियाई क्रीडा स्पर्धेत सुवर्णपदकाची मानकरी ठरलेली भारताची कुस्तीपटू येत्या १३ डिसेंबरला राष्ट्रीय पातळीवरचा कुस्तीपटू आणि दीर्घकाळाचा मित्र सोमवीर राठी याच्यासोबत विवाहबद्ध होत आहे. हा विवाह त्यांच्या गावी आणि जवळच्या नातेवाईकांच्या उपस्थितीत साजरा होणार असल्याचे विनेशच्या कुटुंबियांकडून सांगण्यात आले आहे. विनेश गीता आणि बबिता फोगाट भगिनींची चुलतबहिण आहे आणि तिलाही महादेव फोगाट यांनीच प्रशिक्षण दिले आहे.

विनेश आणि सोमवीर एकमेकांना गेली सात वर्षे ओळखत आहेत. ऑगस्ट २०१८ मध्ये आशियाई स्पर्धेत विनेश सुवर्णपदक जिंकून भारतात परतली होती तेव्हा सोमवीरने तिला विमानतळावरचा प्रपोज करून अंगठी घातली होती. विनेश आणि सोमवीर दोघेही रेल्वे मध्ये नोकरी करत आहेत. सोमवीर राष्ट्रीय कुस्ती स्पर्धेतील कांस्य पदक विजेता आहे.

Leave a Comment