पेमेंट सेवेच्या विस्तारासाठी व्हॉट्सअॅप प्रमुखांनी आरबीआयकडे मागितली परवानगी

whatsapp
नवी दिल्ली – पेमेंट सेवा देण्यासाठी व्हॉट्सअॅप हे सज्ज होत असून आरबीआयला पत्र लिहून पेमेंट सेवेच्या विस्तारासाठी व्हॉट्सअॅप प्रमुखांनी परवानगी मागितली आहे.

पेमेंटच्या सेवेची व्हॉट्सअॅपने १० लाख वापरकर्त्यांसाठी घेण्यात आलेली चाचणी यशस्वी झाली असून व्हॉट्सअॅपने दोन वर्षानंतर पेमेंट सेवा सुरू करण्यासाठी सरकारी पातळीवर हालचाली सुरू केल्या आहेत. व्हॉट्सअॅपची स्पर्धक कंपनी गुगलने पेमेंट सेवेत पाय रोवण्यास सुरुवात केली आहे. अशा स्थितीत पेमेंट सेवेचा विस्तार करण्यासाठी व्हॉट्सअॅपही प्रयत्न करत आहे.

आरबीआयला व्हॉट्सअॅपचे प्रमुख ख्रिस डॅनियल्स यांनी पत्र लिहून पेमेंट सेवेची देशात चाचणी घेत असल्याची माहिती दिली असून डॅनियल्स यांनी पत्रात ही सेवा सुरक्षित आणि उपयुक्त असल्याची ग्वाही दिली आहे. वित्तीय समावेशकता (Financial inclusion ) आणि डिजीटल सक्षमीकरणाने भारतीयांचे जीवनमान सुधारेल असेल, असा विश्वासही त्यांनी आरबीआयला पत्रातून दिला आहे.

भागीदार बँकांनीही आरबीआयकडे पेमेंट सेवेच्या परवानगी मागितल्याचे व्हॉट्सअॅप प्रमुखांच्या ५ नोव्हेंबरच्या पत्रात म्हटले आहे. देशाच्या डिजीटल अर्थव्यवस्थेला आधार देण्यासाठी पेमेंट सेवा देणार असल्याचे व्हॉट्सअॅप प्रवक्त्याने म्हटले आहे. वापरकर्त्यांनी पेमेंट सेवेच्या चाचणी सेवेबाबत सकारात्मक प्रतिसाद दिल्याचेही प्रवक्त्याने म्हटले आहे.

Leave a Comment