‘या’ २ भारतीय कंपन्यांच्या काळ्या पैशाची माहिती देणार स्विस बँक!

swiss-bank
नवी दिल्ली – स्वित्झर्लंड सरकार आपली ‘काळ्या पैशांचे नंदनवन’ ही ओळख पुसण्यासाठी प्रयत्न करत असून त्या पार्श्वभूमीवर स्वीस सरकारने स्विस बँकेत काळा पैसा ठेवणाऱ्या दोन भारतीय कंपन्याची माहिती देण्याची तयारी दर्शविली आहे. सध्या भारतात करचोरीसह इतर आर्थिक प्रकरणात या दोन्ही कंपन्यांची चौकशी सुरू आहे.

एक स्वतंत्र गॅझेट नोटिफिकेशन स्विस सरकारने काढले असून स्विसच्या कर विभागाने यामध्ये भारताच्या विनंतीवरुन प्रशासकीय सहकार्य करण्याची तयारी दर्शविली आहे. जीओडेसिक लि. आणि आदी एन्टरप्रायजेस प्रायव्हेट लि. या कंपन्यांच्या माहितीचा यामध्ये समावेश आहे.

स्वीस सरकार भारताला जीओडेसिक लि. कंपनीचे पंकजकुमार ओंकार श्रीवास्तव, प्रशांत शरद मुळेकर आणि किरण कुलकर्णी यांची आर्थिक माहितीही देणार आहे. शेअर बाजारात या दोन्ही कंपन्यांची नोंदणी करण्यात आली होती. सेबीने यापूर्वीच दोन्ही कंपन्यांवर नियमभंग केल्याप्रकरणी कारवाई केली. यामधील एका कंपनीचे तामिळनाडूमध्ये राजकीय लांगेबांधे असल्याचे समोर आले होते.

दोन्ही कंपन्या आणि काळ्या पैशाच्या प्रकरणावरुन चर्चेत आलेल्या तिन्ही लोकांच्या प्रतिक्रिया अद्याप मिळू शकल्या नाहीत. यापूर्वी त्यांनी काहीही चुकीचे केले नसल्याचा दावा केला होता. बँकिगची माहिती गोपनीय ठेवण्यासाठी स्वित्झर्लंड सरकार हे ओळखले जाते. पण विविध देशांनी काळ्या पैशावरुन स्वित्झर्लंड सरकारबद्दल नाराजी व्यक्त केली होती. त्यानंतर स्वित्झर्लंडने भारतासह अनेक देशांना काळ्या पैशाबाबत माहिती देण्यास सुरुवात केली आहे. स्विस बँकेतील भारतीयांची माहिती स्वंयचलित पद्धतीने भारत सरकारला कळू शकणार आहेत. ही यंत्रणा पुढील वर्षी कार्यान्वित होणार आहे.

Leave a Comment