असे होते बार्बरा आणि जॉर्ज बुश (सिनियर) यांचे दाम्पत्यजीवन

bush
अकेरीकेचे माजी राष्ट्राध्यक्ष जॉर्ज एच डब्ल्यू बुश यांचे नुकतेच, वयाच्या ९४व्या वर्षी निधन झाले. त्यांची पत्नी बार्बरा यांचे ही काही महिन्यांपूर्वीच निधन झाले होते. जॉर्ज आणि बार्बरा यांचे सहजीवन तब्बल ७३ वर्षांचे होते. आजवरच्या अमेरिकेच्या इतिहासामध्ये कुठल्याही राष्ट्राध्यक्षाचे दाम्पत्यजीवन इतके जास्त नाही. या दांपत्याप्रमाणेच यांची प्रेमकहाणी देखील अतिशय रोचक आहे.


१९४१ साली ग्रीनविच, कनेक्टीकट येथील राऊंड हिल क्लब मध्ये नाताळच्या सणानिमित्त आयोजित नृत्याच्या कार्यक्रमामध्ये जॉर्ज आणि बार्बराची प्रथम भेट झाली. तेव्हा बार्बरा साऊथ कॅरोलीना येथे शिक्षण घेत असून, जॉर्ज यांचे शिक्षण मॅसच्युसेट्स येथे सुरु होते. त्यानंतर दोघे आपपल्या गावी परतल्यानंतरही दोघे एकमेकांच्या संपर्कात राहिले. मैत्रीचे रूपांतर प्रेमामध्ये झाले, आणि सुमारे दीड वर्षाच्या कालावधीनंतर या दोघांनी विवाह करण्याचे निश्चित केले. त्याकाळी दुसरे महायुद्ध सुरु असल्याने जॉर्ज यांना त्वरेने सैन्यामध्ये त्यांच्या कामगिरीवर रुजू व्हावे लागले. युद्धामध्ये जॉर्ज यांच्या विमानावर हल्ला होऊन त्यांचे विमान विमान समुद्रामध्ये कोसळले. सुदैवाने अमेरिकन पाणबुडी वरील सैनिकांनी जॉर्जना वाचविले.


त्यानंतर जॉर्ज यांना सुट्टी देऊन घरी पाठविण्यात आल्यानंतर १९४४ साली जॉर्ज आणि बार्बरा विवाहबद्ध झाले. त्यानंतर उच्च शिक्षण पूर्ण करण्यासाठी जॉर्ज यांनी येल विद्यापीठामध्ये प्रवेश घेतला. लवकरच या दाम्पत्याला पहिले अपत्य झाले. त्यानंतर बुश परिवाराने आधी टेक्सास आणि त्यानंतर कॅलिफोर्निया येथे मुक्काम हलविला. या दामाप्त्याचे गृहस्थजीवन सुरळीत सुरु झाले आणि पुढील काळामध्ये त्यांना आणखी चार अपत्ये झाली. एव्हाना बुश परिवार स्थिरस्थावर झाला होता. त्यावेळी जॉर्ज यांनी राजनीतीमध्ये रस घेण्यास सुरुवात केली. येथे त्यांची कारकीर्द उत्तम सुरु राहून ते काँग्रेसचे सभासद बनले. त्यानंतर वॉशिंग्टन डी सी येथे स्थायिक झाल्यांनतर जॉर्ज यांनी राजनीतीमध्ये संपूर्ण लक्ष घातले, तर त्यांच्या पाचही अपत्यांच्या पालनाची जबाबदारी लॉराने पेलेली. त्यानंतर रोनाल्ड रेगन यांच्या बरोबर काम करीत असताना, १९८१ ते १९८९ साला पर्यंत जॉर्ज बुश उपराष्ट्रपती म्हणून कार्यरत होते.
bush1
१९८९ जॉर्ज बुश बहुमताने निवडून आल्यानंतर त्या साली २० जानेवारी रोजी त्यांनी अमेरिकेचे ४१वे राष्ट्रपती म्हणून कार्यभार स्वीकारला, आणि त्याचबरोबर बार्बरा अमेरिकेच्या ‘फर्स्ट लेडी’ बनल्या. जॉर्ज यांच्याशी विवाहबद्ध होणे हा त्यांच्या आयुष्यातील सर्वात महत्वाचा क्षण असल्याचे लॉरा म्हणत असून, त्यांच्या संगतीमध्ये आपण सदैव आनंदी राहत असल्याचे समाधान लॉरा व्यक्त करीत असत.

Leave a Comment