व्हॉट्सअॅपने घेऊन येत सावधगिरीचे फिचर

whatsapp1
पाठवलेले मॅसेज काही काळात डिलीट करण्याचे फिचर व्हॉट्सअॅपने लाँच केलेले असतानाच व्हॉट्सअॅप आता आणखी एक सावधगिरीचे फिचर घेऊन येत आहे. अन्य अॅपवरून बऱ्याचदा एखादी लिंक शेअर करताना भलतीच लिंक एखाद्याला गेल्याचे प्रकार घडल्याने लाजिरवाणे वाटण्याचे प्रकार घडत होते. व्हॉट्सअॅपने ही लिंक एका पेक्षा जास्त लोकांना पाठविताना सेंड करण्याआधीच आता प्रिव्ह्यु पाहण्याची सोय केली आहे.


व्हॉट्सअॅपने काही महिन्यांपूर्वी एखाद्याला पाठविलेला मॅसेज काही काळामध्येच त्याच्या मॅसेज विंडोमधून डिलीट करण्याचे फिचर आणले होते. यामुळे एखाद्याला चुकीचा मॅसेज गेला असल्यास तो तातडीने मागे घेता येत आहे. ही सोय लिंक मागे घेण्यासाठीही असली तरीही काहीवेळा पाठविल्याबरोबरच मॅसेज पाहिले जात असल्याने चुकीची लिंक चुकीच्या व्यक्तीला पाठविण्याने समस्या निर्माण होत होत्या. पण आता यावर व्हॉट्सअॅपने उपाय शोधला आहे. हे फिचर सध्या बिटा व्हर्जनवरच उपलब्ध असून ते लवकरच सर्वांसाठी उपलब्ध करण्यात येणार आहे. हे फिचर वापरण्यासाठी 2.18.366 हे बिटा व्हर्जन डाऊनलोड करावे लागणार आहे.

Leave a Comment