९६ वर्षीय पेंटरने कलेतून वाचविले त्याचे गाव

village
तैवान मधील २८ लाख वस्तीचे एक गाव उध्वस्त होण्यापासून एका ९६ वर्षीय पेंटरने वाचविले आहे. पेंटरच्या या कुर्तीमुळे चीन सरकारला गाव उधवस्त करण्याचा निर्णय मागे घ्यावा लागला आणि आज हेच गाव जगातील पर्यटकांचे आवडते स्थळ बनले आहे.

huaang
या गावाची कहाणी खूप जुनी म्हणजे दुसऱ्या महायुद्धापासून सुरु होते. चीनतर्फे जपानविरोधी लढाईत सैनिक म्हणून लढलेले हुआंग युंग फु याच्या अबोल पण ठाम निश्चयाची हि कहाणी. महायुद्ध संपल्यावर हुआंग माओ विरोधी नॅशनलीस्ट पक्षात सहभागी झाले. मात्र या पक्षाला सत्ता स्थापनेत यश आले नाही तेव्हा २० या सेनेतील २० लाख सैनिकांना तैवान येथे निर्वासित करण्यात आले. तेव्हा त्यांच्यासाठी छोटी छोटी घरे असलेली ८७९ गावे वसविली गेली मात्र कालांतराने हि गावे नष्ट करून तेथे मोठ्या इमारती बांधल्या गेल्या.

rainbow
२००८ साली चीन सरकारने हुआंग यांचे गाव नष्ट करण्याचा आदेश दिला तेव्हा ते ८६ वर्षाचे होते. अदेह मिळताच त्यांनी रंगाचा ब्रश हाती घेतला आणि गावातील घरे, दारे, खिडक्या, रस्ते, वरांडे सुंदर चित्रांनी सजवायला सुरवात केली. रोज रात्री ३ तास ते आजही काम करत आहेत. पाहता पाहता या गावाचे रुपडे बदलले आणि आज ते इंद्रधनुषी गाव म्हणून जगात प्रसिद्ध झाले आहे. हुआंग वयाच्या ५ व्या वर्षीपासून चित्रे काढत होते ती कला त्यांना त्यांचे गाव सुंदर करण्याच्या कामी आली. हे गाव नष्ट करू नये म्हणून ८० हजार गावकऱ्यांनी महापौरांकडे आर्जव केले आणि सरकारला निर्णय मागे घेण्यास भाग पडले. हुआंग या गावाचे रेनबो आजोबा म्हणून प्रसिद्ध झाले आहेत. आज या गावाला दरवर्षी १० लाख पर्यटक भेट देतात.

Leave a Comment