माही झारखंडमधील सर्वात बडा आयकरदाता

dhoni
टीम इंडियाचा माजी कप्तान महेंद्रसिंग धोनी झारखंड राज्यातील सर्वाधिक आयकर भरणारा आयकरदाता ठरला असून त्याने २०१७-१८ सालासाठी ५७.०४ कोटी रुपये आयकर भरला असल्याचे आयकर विभागाने जाहीर केले आहे. शुक्रवारी झारखंड आयकर विभागाने तीन श्रेणीत सर्वाधिक आयकर भरणा करणाऱ्या ९ जणांचा सन्मान केला यावेळी हि माहिती दिली गेली. या सन्मानाला धोनी उपस्थित नव्हता. तो जेएससीए क्रिकेट कंट्री क्लबच्या टेनिस टूरनामेंट खेळत होता आणि त्याने हे विजेतेपद जिंकले. याचवेळी ७५ आयकर अधिकारी आणि कर्मचारी यानाही चांगले काम केल्याबद्दल सन्मानित करण्यात आले.

आयकर विभागाने जारी केलेल्या माहितीनुसार सर्वाधिक वैयक्तिक आयकर भरणा करणाऱ्यात माही नंतर व्यावसायिक नंदकिशोर व तीन नंबरवर व्यावसयिक शंकर प्रसाद यांचा समावेश आहे. कार्पोरेट जगतात सर्वाधिक कर सीसीएल कंपनीने भरला असून हि रक्कम २७६७.२८ कोटी आहे. फर्म व्हीभागात सर्वाधिक कर रांचीच्या बिग शॉपने भरला असून हि रक्कम ५.८२ कोटी रुपये आहे.

Leave a Comment