पँटालुन – असा बनला आजचा लोकप्रिय ब्रांड

pantloon
आज छोट्या मोठ्या शहरात जागोजागी पँटालुन या फ्युचर ग्रुपच्या दुकानांनी चांगलाच जम बसविला असून लहान थोर सर्वाना मनपसंत कपडे मिळण्याचे हमखास ठिकाण अशी प्रसिद्धी मिळविली आहे. किशोर बियाणी याच्या व्यवसाय यशाची हि गाथा फॅशनला नवी परिभाषा देणारी ठरली. देशातील १०० श्रीमंत उद्योगपतीच्या यादीत समविष्ट असलेले किशोर बियाणी यांनी पँटालुन नाव कसे निवडले त्याची कहाणीही मजेदार आहे.

किशोर बियाणी याच्या आजोबांचे मुंबईत छोटे साडी दुकान होते तेथेच किशोर काम करत असत. साडीशिवाय वेगळे काहीतरी करायचे म्हणून त्यांनी ट्राऊझरचे मराठी नाव पाटलोन किंवा हिंदी पतलून नावावरून फॅशनेबल वाटेल असे पँटालुन नाव निश्चित केले ते १९९१ असली गोव्यात पहिली शोरूम सुरु झाली तेव्हा. त्याअगोदर मेन्सवेअर प्रायव्हेट कंपनी त्यांनी १९८७ साली सुरु केली होती. १९९२ मध्ये पँटालुन ला ब्रांड म्हणून मान्यता मिळाली आणि त्यानंतर आज पँटालुन हा इतिहास झाला आहे.

बियाणी यांनी २००१ मध्ये फ्युचर ग्रुपच्या माध्यमातून बिग बझार हा फूड बाजार, फॅशन, होम टाऊन, सेन्ट्रल, ईझीऑन ब्रांड सुरु केले आणि आज त्यांचे साम्राज्य बनले आहे. किशोर यांना शालेय जीवनापासून एकाच विषयात रुची होती आणि ती म्हणजे व्यवसाय. ओळखीच्या दुकानदारांच्या दुकानात रोज बसून ते ग्राहकांचे निरीक्षण करत असत आणि हळूहळू ग्राहकांना काय हवे याचा अंदाज त्यांना येऊ लागला असे ते सांगतात. आज बियाणी यांचा व्यवसाय २४० कोटी डॉलर्स म्हणजे १७ हजार कोटींचा आहे.

Leave a Comment