टोयोटोने ५ जी तंत्रज्ञानाचा वापर करून बनविला रोबो

robot
जपानच्या टोयोटा कंपनीने ह्युमनाईद टी- एचआर ३ रोबोचे नवे व्हर्जन ५ जी तंत्रज्ञानाचा वापर करून तयार केले असून हा रोबो माणसाच्या मदतीसाठी तयार आहे असे जाहीर केले आहे. घराप्रमाणे हॉस्पिटलमध्येहि त्याचा वापर होऊ शकणार आहे. तसेच भविष्यात अंतराळात त्याचा वापर केला जाणार आहे. ५ जी कम्युनिकेशन मुळे हा रोबो १० किमी अंतरावरून कंट्रोल करता येतो.

या रोबोट मास्टर मॅन्यूवेअरिंग सिस्टीमचा वापर केला गेला आहे. त्यामुळे हा रोबो सेन्सरच्या मदतीने माणसासारख्या हालचाली करतो. माणूस जश्या कृती करेल म्हणजे उदाहरणार्थ हात हलविणे, उड्या मारणे, एका पायावर उभे राहणे अश्या क्रिया हा रोबो करू शकतो.

Leave a Comment