जी २० परिषद भारतात होणार, मोदी नीतीचे यश

g20-summit
मोदींच्या चाणक्यनीतीला आंतरराष्ट्रीय स्तरावर मोठे यश मिळाले असून जगातील २० बलाढ्य देशाचा सहभाग असलेली जी २० परिषद २०२२ मध्ये भारतात आयोजित होणार आहे. बृनोस आयलंड येथे नुकत्याच पार पडलेल्या जी २० शिखर परिषदेत मोदी यांनी २०२२ ची शिखर परिषदेचे यजमानपद भारताला द्यावे अशी विनंती इटलीला केली आणि इटलीसह अन्य देशांनी त्याला मान्यता दिली. पूर्व नियोजनानुसार हि परिषद इटली येथे होणार होती.

२०२२ साल भारताच्या स्वतंत्र्याचे ७५ वे वर्ष आहे आणि त्या निमित्ताने मोदी सरकारने न्यू इंडिया घोषणा दिली आहे. त्यानिमित्ताने जी २० शिखर परिषद भारतात भरविली जावी अशी इच्छा मोदी यांनी व्यक्त केली. मोदी यांनी नुकत्याच पार पडलेल्या परिषदेत इटली सरकारला २०२१ ची परिषद तुम्ही भरवा आणि २०२२ ला भारताला संधी द्या या शब्दात केलेली विनंती मान्य झाल्याबरोबर इटलीला धन्यवाद दिले आणि जगाचे नेतृत्व करणाऱ्या सर्व बड्या नेत्यांनी भारतात यावे असे आमंत्रणही दिले. या वेळी मोदी म्हणले भारत जगातील वेगाने विकसित होत असलेल्या अर्थव्यवस्थेत आघाडीवर आहे. आमच्या देशात तुम्ही या, आमची संस्कृती, आमचा समृद्ध इतिहास आणि विविधता जाणून घ्या. भारताच्या आतिथ्याचा अनुभव घ्या.

Leave a Comment