भारतात का आणि कधी लागू केला पिन कोड

pin-code
माणसाची ओळख आधार कार्ड आणि मतदान ओळखपत्राद्वारे होते. गाड्यांची ओळख त्यांच्या नंबर प्लेट्स वरून होते तर मोबाइल नंबरची ओळख त्याच्या कंट्री कोडने होते. तसेच पिन कोड प्रत्येक देश, राज्य आणि शहराच्या ओळखीसाठी आवश्यक आहे.

६ अंकांवरून राज्याची ओळख होते. जगभरात एकेकाळी तंत्रज्ञानाचा अभाव होता. लोक तेव्हा पत्रांच्या आधारे एकमेकांशी संपर्क साधत होते. अशातच आपण ज्याला पत्र पाठवणार आहोत त्याला व्यवस्थितरित्या मिळावे यासाठी पिन कोडची व्यवस्था करण्यात आली. याच पिन कोडच्या माध्यमातून जगातील कोणत्याही कोपऱ्यात कोणलाही पत्र किंवा सामान पाठवायचे असेल तर ते त्या व्यक्तीपर्यंत पाठवता येते.

१५ ऑगस्ट १९७२ रोजी भारतामध्ये पिन कोडची सुरूवात झाली होती. केंद्रीय संचार मंत्रालयाचे पूर्व अतिरिक्त सचिव श्रीराम भिकाजी वेलांकर यांची देण आहे. पिन कोड देशाच्या ९ विभागात विभागला गेला असून सेनेसाठी यामध्ये वेगळा विभाग निर्माण करण्यात आला आहे.

अनेक राज्य भारतामध्ये असेआहेत जिथे एकसारखे नावाचे गाव आहेत. एकाच राज्यात रामपूर, रामनगर आणि प्रेमनगर नावाचे अनेक गाव सापडतील. लोकांना १९७२च्या आधी विना पिन कोडमुळे बऱ्याच अडचणींचा सामना करावा लागत होता. एका पत्रासाठी लोकांना काही महिने किंवा वर्षभराची वाट पहावी लागत होती. तर काही लोक असा पत्ता लिहीत होते की स्पष्टपणे दिसत नसल्यामुळे पोस्ट विभागाला पत्ता जाणून घेण्यास अडचण होत होती.

त्यात देशातील वेगवेगळ्या असलेल्या भाषांमुळे परिस्थिती आणखीनच बिकट होत होती. प्रत्येक राज्याचा एक विशेष कोड अशाच अनेक समस्यांचे समाधान करण्यासाठी तयार करण्यात आला. आपण त्याला पिन कोडच्या नावाने ओळखतो. पिन कोडच्या एकूण ६ अंकांपैकी सुरूवातपासूनचा तिसरा अंक जिल्ह्यासाठी असतो तर शेवटचे तीन अंक पोस्ट ऑफिससाठी असतात.

Leave a Comment