घरगुती अनुदानित सिलेंडर झाला स्वस्त

cylinder
नवी दिल्ली – ६.५ रुपयांची घट घरगुती अनुदानित सिलेंडरच्या किंमतीत झाली असून शुक्रवारी दिल्लीत या संदर्भातील घोषणा करण्यात आली आहे.

साडेसहा रुपयाची घट घरगुती वापरासाठी उपयोगात आणल्या जाणाऱ्या १४.२ किलो वजनाच्या गॅस सिलेंडर किंमतीत झाली आहे. हा सिलेंडर किंमतीत बदल होण्यापूर्वी ५०७.४२ रुपयांना मिळायचा आता या सिलेंडरची किंमत ५००.९० रुपये आहे. भारतात इंधन विक्री करणारी सर्वात मोठी कंपनी असलेल्या इंडियन ऑईल कार्पोरेशन (आयओसी) कडून किंमतीतील या बदलांना अधिकृत दुजोरा देण्यात आला.

मागील सलग सहा महिन्यातील दरवाढीनंतर सिलेंडरच्या किंमतीत ही घट दिसून आली आहे. तर इंडियन ऑईल कार्पोरेशन (आयओसी) कडूनच देण्यात आलेल्या माहितीनुसार अांतरराष्ट्रीय बाजारातील इंधनाच्या किंमतीत झालेली घसरण आणि भारतीय रुपयाचे वाढलेले मूल्य या पार्श्वभूमीवर विनाअनुदानित सिलेंडरचीही किंमतही १३३ रुपयांनी कमी झाली आहे. राजधानी दिल्लीत विनाअनुदानित सिलेंडरची किंमत आता ८०९.५० एवढी आहे.

Leave a Comment