नवी दिल्ली – भारतीय ओळख प्राधिकरणाने (यूआयडीएआय) बँकांना आधार कार्डच्या मदतीने बँकांचे व्यवहार बंद न करण्याची सूचना केली असून कल्याणकारी योजनांच्या व्यवहारात आधारचा महत्वाचा सहभाग आहे. आधारच्या मदतीने केले जाणारे व्यवहार जर बंद करण्यात आले, तर योजनांच्या लाभार्थ्यांना अडथळे निर्माण होण्याची शक्यता यूआयडीएआयने वर्तवली आहे.
बंद करू नका आधारच्या सहाय्याने होणारे व्यवहार – यूआयडीएआय
दरम्यान, काही दिवसांआधी स्टेट बँक ऑफ इंडियाने नॅशनल पेमेंट कॉर्पोरेशन ऑफ इंडीयाला(एनपीसीआय) दिलेल्या पत्रात आधारच्या मदतीने होणारे व्यवहार बंद करण्यात यावे, याची मागणी केली आहे. यूआयडीएआयने ही सूचना या पत्रासंबधी बोलताना केली.